मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

दुःख 🖤🤍🖤

आज पुन्हा जुनाच विषय नव्याने घेऊन आलीये . मी या आधीही दुःख या विषयावर लिहिले आहे. परंतु यावेळी दुःखाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन थोडा वेगळा  आणि  व्यापक आहे.  या विषयावर पुन्हा लिहावे वाटले यामागे काही कारणे आहेत. कारण तसेच काही अनुभव गेल्या काही महिन्यात मी घेतले आहे आणि तेव्हाच मला या दुःखाची जाणीव झाली ती नव्याने.   हो ..... पहिल्यांदा लेखात "मी" असा उल्लेख करत आहे. या आधी मी लेखात " आपण " असा उल्लेख केला आहे. परंतु यावेळी माझे अनुभव मी मांडणार आहे. खरं तर मला असे लिहायचे नव्हते, पण दुःखाकडे पाहण्याचा तुमचाही दृष्टिकोन थोडा बदलावा म्हणून लिहिते. मला जे जाणवले, जे पाहिले , जे अनुभवले  ते फक्त स्व: स्तरावर आहे, म्हणून प्रत्येकाच्या बाबतीत असेच घडेल असे असू शकत नाही म्हणून "मी". आपल्याला जर कोणी विचारले की तू दुःखात आहेस का?  काही प्रॉब्लेम ,टेन्शन आहे का?  तर बऱ्याचदा लोक काही नाही म्हणून तो विषय टाळतात. पण प्रॉब्लेम, टेन्शन ,दुःख कोणाला नसतात. सगळेच यातून जात असतात आणि तो आपल्या आयुष्य जगण्याचा एक भागच आहे .एकवेळ प्रॉब्लेम, टेन्शन काही काळाने नाहीसे हो

नवीनतम पोस्ट