तुझ्यातली मी

तूझ्याच मूळे जाणवले स्वःचे अस्तित्व.....
 तुझ्याच मूळे समजले असण्याचे महत्व
 
तुझ्याच मुळे मिळाली जगण्याला आशा....
 तुझ्याच मुळे शिकले  प्रेमाची भाषा

तुझीच अभिलाषा मनोमनी.....
तुझेच विचार क्षणोक्षणी

तूच असतो दीर्घ श्वासात.....
तूच भासतो मोकळ्या आकाशात

तुझ्याच मुळे आहे या जीवनाला अर्थ.....
तुझ्या विणा आहे सगळेच व्यर्थ 

तूच आहेस माझ्या आयुष्याचा थांबा
तुझ्याशिवाय काही दिसेना आता......

बघ कशी किती रे तुझ्यात मी गुंतले.....
भौतिक मोहाचे पाश सगळे  सुटले

म्हणून एकच विनंती बाळा तुला
धरू नकोस रे अबोला.....
धरू नकोस रे अबोला......
धरू नकोस रे अबोला......

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट