understanding.....समजून घेणे

  खुप दिवसापासून काही तरी लिहावे असे वाटत होते, म्हणून  केली सुरुवात ,
नवीन वर्षाचे निम्मित साधून......
 एका वेगळ्या विषया पासून....
वाटले तर प्रतिसाद आणि प्रतिक्रिया  नक्की द्या. 


 Understanding....समजून घेणे 
अगदी सहजपणे आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरला जाणारा शब्द.....समजून घेणे
परंतु जितक्या सहजतेने आपण हा वापरतो तितक्याच सहजतेने तो आपण आमलात आणतो का? खरंच समोरच्याची बाजू ऐकून घेऊन किंवा समोरील परिस्थिती चे भान ठेवून त्याप्रमाणे वागतो का...? का उगाच आऊचा बाऊ करतो? 
मुळात समजून घेणे ही संकल्पनाच मला पटत नाही...आश्चर्य चकित होऊ नका... कसे ते सांगते. माझं वैयक्तिक मत. माझ्या दृष्टीने understandingचे दोन प्रकार असतात.
) परिस्थितीशी समजून घेणे (Situational Understanding) 
२)  भावनिक स्तरावर समजून घेणे ( Emotional understanding)
आधी पाहुयात  Situational Understanding....  म्हणजेच  व्यक्ती  परिस्थितीत ,मग ती आर्थिक, प्रासंगिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची परिस्थिती असू शकते.त्यामागील कारणे आपण गृहीत धरून परिस्थिती समजून घेतो.अनेक उदाहरणे असतात जी परिस्थितीशी निगडित असतात तेव्हा आपण समजून घेण्याची भूमिका घेतो. परंतु याला काही अपवाद असतात. प्रत्येक जण नाही समजु शकत  Situational Understanding.  काही जण इथेही मार खातात, त्यांना आपण बालिश म्हणतो.  कालांतराने  ज्यांना आपण बालिश म्हणतो त्या व्यक्तीही आपल्या  बौद्धिक  क्षमतेप्रमाणे परिस्थिशी जुळवून घेतात... कमीत कमी तसा प्रयत्न तरी करतात.
आता वळूयात Emotional Understanding कडे म्हणजेच भावनिक स्तरावरील समजूतदारपणा. या प्रकारचा  समजूतदारपणा बहुतेक नात्यांमध्ये दिसून येतो.  इथे  कौटुंबिक, व्यावहारिक,  सामाजिक नाते आणि आपल्याला परिचयातील व्यक्ती,मित्र- मैत्रिणी असू शकतात.
नात्यांमध्ये एकमेकांशी बोलताना बऱ्याचदा म्हणतात मला समजून घे किंवा तू मला समजून घेऊ शकत नाही. ....ही संकल्पना खटकते.
मुळात काय समजून घेण्यासाठी संवाद साधणे गरजेचे असते. त्याशिवाय समोरच्याला आपल्या भावना, आपली मते, विचार कसे कळणार. काही जणांना असेही वाटते की आपण न बोलता केवळ आपल्या वागण्यावरून  आपल्याला समजून घ्यावे बऱ्याचदा  असेही म्हणताना ऐकले आहे, तुम्हाला  सांगून काय उपयोग, तुम्हाला काय समजणार माझी स्थिती.आता हे कसं शक्य आहे संवादाशिवाय .....कोणी तुमच्या मनात प्रवेश करू शकणार आहे का? त्याहूनही काही जण बऱ्यापैकी समोरच्याला समजून घेतही असतात परंतु हे त्या व्यक्तीलाच कळत नसते....असो.
मुद्दा हा की मुळात हव्यातच कशाला आपल्याला कुबड्या? का गरज वाटते की कोणी आपल्याला समजून घ्यावे, का व्यक्ती नेहमी बाहेर भावनिक आधार शोधत असतो ? बर  प्रेम,आदर,काळजी, करुणा या भावना आहेतच, मग समजून घेण्यासाठी का बरे अवलंबून राहावे ? व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसतो का....? का दुसऱ्यावर विसंबून  राहावेसे वाटते....? का स्वतःहून आपल्या क्षमतेला कुंपणे घातली जातात?  महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वात जास्त कोणासोबत बोलत असू तर ती व्यक्ती आपण स्वतः असतो. आपला संवाद स्वतः सोबत होत असताना बाहेरील कुबड्याचा आधार का शोधावा? या विश्वात आपल्याला सगळ्यात चांगल्या पद्धतीने कोणी समजु शकत असेल तर ती व्यक्ती आपण स्वतः असतो. आपले विचार, 
भावना  स्वतः  पेक्षा  चांगल्या प्रकारे कोणीच समजून घेऊ  शकणार नाही. त्यामुळे बाहेरून ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. संवाद स्व सोबत साधा आणि स्वतः च स्वतःला समजून घ्या. हाच फरक आहे दोन्ही  Understanding  मध्ये.
तात्पर्य इतकेच  Emotional Understanding साठी बाहेर दोष देत बसण्यापेक्षा  स्वतःच्या  क्षमता ओळखा, स्वतःला  ओळखा. तुमच्या नकळतच तुमची ओळख तुमच्यातील मित्रासोबत होईल, सगळ्यात चांगल्या मित्रासोबत......
त्यानंतर तुम्हाला समजून घेण्यासाठी कोणाची गरज पडणार नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ असणार आहात.
" No One Can Understand You.... Without Yourself...." 





 








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट