प्रेम

प्रेम ....  LOVE .....किती सुंदर भावना आहे ना....
इंटरेस्टिंग सब्जेक्ट   सगळ्या साठीच.   लहानांपासून थोरांपर्यंत. प्रेमा बद्दल काय आणि किती बोलल तरी कमीच.  प्रेम अशी भावना आहे ज्यात  सर्वांना आखठं  बुडावेसे  वाटते.   आजपर्यंत  प्रेमाची परिभाषा  खूप लोकांनी  आपापल्या परीने  केली आहे आणि ती बरोबरही आहे, परंतु  जी परिभाषा शब्दात मांडता येऊ शकत नाही असे आहे प्रेम ..
प्युअर .....नितळ, पारदर्शक.
पण खर प्रेम काय असते हे बऱ्याच जणांना आजपर्यंत समजलच नाही. सध्याच्या या ऍडव्हान्स  टेकनोलॉजिच्या युगात तर   प्रेमाचा पूर्ण  अर्थच बदलला आहे.  आज काल  कशालाही प्रेमाचे नाव दिले जाते. 
 
 प्रेमाचे ही प्रकार  आहेत.
१) निस्वार्थ प्रेम
२) आकर्षणातून  असलेले प्रेम
३) दिव्य प्रेम
   
निस्वार्थ प्रेमा बद्दल  सगळ्यांना माहितीच आहे. ते म्हणजे  आई  बाबांचे  आपल्या मुलांवर असलेले  प्रेम. या प्रेमाला तर तोडच नाही. त्यांच्या सारखे निस्वार्थ प्रेम  कोणी करूच शकत नाही . आपल्या  गरजा च्याही आधी आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करतात ते  आई बाबा.

आकर्षणातून असलेले प्रेम हे क्षणिक असते.   मोहाला बळी पडलेले. जे फक्त शरीरा पुरते मर्यादित असते.   कधी कधी वासनांध झालेले. जस जसा वेळ जाईल तसे हे प्रेम कमी होत जाते. मुळात जे कमी जास्त होते ते प्रेम कसले. प्रेम काही वस्तू नाही की  ज्याचे मोजमाप करता येईल. किंवा प्रेम हे काही  एखादी गोष्ट किंवा कृती ही नाही  जे करावे लागेल, प्रेम ही एक भावना आहे ती असायला हवी. Feel  करायला , अनुभवायला हवी. म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करतो / करते  असे म्हणण्यापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणणे जास्त योग्य वाटेल.

दिव्य  प्रेम हे आकाशा प्रमाणे असते..... असीम. सागरा प्रमाणे अथांग . ज्याला  कोणतीही सीमा नसते. दिव्य प्रेम हे आत्म्याशी connected असते. तुम्ही जितके त्याच्या जवळ जाल तितके ते गहन होते.   पण त्यासाठी खूप साधना करावी लागेल.  तथागत म्हणतात जोपर्यंत आपण स्वतः वर प्रेम करत नाही तो पर्यंत आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. आधी स्वतः वर प्रेम असायला हवे,  आपल्यात प्रेम असेल तरच आपण समोरच्याला प्रेम देऊ  शकू . कारण  प्रेम देणे सुद्धा एक कला आहे. ज्याला  ही कला जमली तो प्रेमात रममाण झाला.  सर्वात आधी हे लक्षात घ्यायला हवे की  स्वीकारने सुध्दा प्रेमच आहे .   ज्या  व्यक्ती वर आपले प्रेम आहे  ती व्यक्ती जो आहे जसा आहे  तसे   स्वीकारता  आले पहिजे  . जसे आपण  स्वतः मधील गुण दोष स्विकारतो अगदी तसेच समोरच्याला सुद्धा स्वीकारावे.  कोणत्याही बदला शिवाय (Change).

प्रेम कसे असावे :
प्रेम हे स्वतंत्र असावे, मुक्त  असावे, कोणतेही बंधन नसावे. प्रेम मनातून असावे.  म्हणजे नेमके काय तर,ज्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे, त्या व्यक्तीचे  अस्तित्व ती व्यक्ती  आपल्या सोबत नसताना सुध्दा  जाणवले पाहिजे. त्यासाठी ती व्यक्ती शरीराने जवळ असणे आवश्यक नाही. मनाने जवळ असावी. त्याचे / तिचे फक्त नाव जरी विचारात  आले तरी चेहऱ्यावर गोड  SMILE  यावी.  त्या व्यक्तीसोबत तिचे विचारही जपावे. त्या व्यक्तीच्या  शब्दांवर सुद्धा प्रेम व्हावे. आपल्या प्रिय व्यक्तीला मिळवण्यापेक्षाही त्याच्या Happiness चा विचार करणे प्रेम, कारण मिळवणं म्हणजे प्रेम नसतंच. सतत त्या व्यक्ती सोबत बोलण्या पेक्षाही कधी तरी त्याच्या डोळ्यातील भाव वाचणे म्हणजे प्रेम. प्रेम ही एक अशी भावना आहे जी फक्त  अनुभवायची असते, फील करायची असते. प्रेमाचे नाते हे सगळ्या नात्यापेक्षा वेगळे असते.  जितका वेळ जाईल तसे हे नाते उलगडत जाते, आणि प्रेम मनात रुजू लागते . त्यासाठी तितका वेळ देणे गरजेचे असते. एकूणच काय तर प्रेम हे आपल्या विचारावर असते, आपण त्याकडे कसे पाहतो ते महत्त्वाचे.
 
प्रेम काय आहे
प्रेम एक प्रवाह आहे,एक शांत  प्रवाह....या प्रवाहात वाहत जायचे अगदी  स्वच्छदं, मनसोक्तFeel the Every Movement.....
प्रवाहात वाहत जायचं, भावनेच्या भरात नाही बर का......
प्रेम ही सगळ्यात  प्युअर भावना आहे . एक शाश्वत सत्य..... जे कधीच  बदलू शकत नाही.   प्रेम आपल्या  विचाराना   प्रगल्भ   बनवते , निस्वार्थ बनवते. प्रेम एक शक्ती आहे एक ऊर्जा आहे जे  आपल्याला  बळ देते  परिस्थितिशी लढण्याची. प्रिय  व्यक्तीच्या  सान्निध्याने, त्याच्या प्रेमळ शब्दाने जगण्याला एक उमेद   मिळते.  आयुष्य  जगण्याची कला म्हणजे प्रेम.  Love is Endless....
  बऱ्याचदा  आपण पाहतो, ऐकतो की  प्रेम दुखावलं गेले तर क्रोध बनते, ईर्षा बनते , प्रेमाचा विषोभ होतो , प्रेमासाठी एखादी व्यक्ती  विक्षिप्त वागते . मुळात त्या व्यक्तीने प्रेमाला  योग्य दृष्टीने पहिलेच नसते, निव्वळ मिळवण्याच्या भावनेतून पाहिले असते. प्रेम व्यक्तीला कधीच विक्षिप्त बनवत नाही तर संवेदनशील बनवते.    करुणामय बनवते. प्रेम माणसाला बदलवून टाकते.  फक्त याकडे  योग्य  दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.  बाकी सर्व काही प्रत्येकाच्या   विचारांवर अवलंबून असते.   प्रेम शोधत बसू नका ,योग्य वेळी ते तुम्हाला गवसेलच. गरज आहे ती फक्त  स्वतःला   शोधण्याची.......
प्रेमाची भावना आपल्या मनात रुजवली की  बाहेरून तुम्हाला  ती नक्कीच जाणवेल.    

Happy Valentine's Day ....
















टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट