Hurt....दुखावणे (दुखापत)

बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा  लिहायला घेतले.
विषय आपला नेहमी प्रमाणेच रोजच्या  वापरातील शब्द..... HURT......दुखावणे . सर्रास वापरला जाणारा शब्द आणि  थोडा इमोशनल टॉपिक.  

आजकालच्या  परिस्थितीत सगळेच जण छोट्या छोट्या कारणावरून दुखावले जातात. लहान, थोर, तरुण, वृद्ध  ....सगळ्यांच्या Hurt होण्याची कारणे देखील वेगवेगळी.  काही कारणे अगदी योग्य तर काही अगदीच क्षुल्लक.  कधी उगाच छोट्या   गोष्टींचा बाऊ केला जातो तर कधी मोठे कारण असून सुद्धा सामंजस्य पणा दाखवत  त्याकडे रितसर दुर्लक्ष केले जाते. कारण आपल्याला  दुखावणारी माणसे ही बऱ्याचदा आपलीच असतात, त्यामुळे कधी अतिरेक करणे तर  कधी सोडून देणे हे ओघाने आलेच.  हे सगळे  होत असताना आपण मात्र दुखावले जात असतो हे नक्की.  

बरे आपण  दुखावले कधी आणि कसे जातो. एक तर  जेव्हा आपल्याला एखादी शारीरिक इजा  होते तेव्हा आणि  जेव्हा आपण  आपल्याच माणसांकडून  अपेक्षा ठेवतो  आणि ती पूर्ण होत नाही  तेव्हा.  अजून एक आपल्याच नात्यातील व्यक्ती कडून किंवा परिचयातील माणसांकडून  आपल्या वर झालेला शाब्दिक  
 हल्ला.... यावरून हे लक्षात येते की Hurt  सुध्दा दोन  प्रकारचे आहेत. 
१) शारीरिक इजा , दुखापत  Physical Hurt
२)  भावनिक दुखापत  Emotional Hurt 

वेळेत मलम पट्टी केली की  शारीरिक इजा बऱ्या होतात.  परंतु   भावनिक दुखापती मधून बाहेर पडण्यासाठी वेळच जाऊ द्यावा लागतो.   वेळ दिला  म्हणजे  परिस्थिती    सुरळीत होते आणि व्यक्ती  सावरतात.   या दोन्ही परिस्थितीत वेळ ही महत्त्वाची भूमिका बजावते. 

बर Hurt म्हणजे काय ?  What's the defination of Hurt. For my point of view.. Hurt means....  Wrong Thought Creation by ourself .  म्हणजेच  आपणहूनच चुकीचे विचार आपल्या मनात निर्माण करणे . मुळात काय तर आपल्याला  फक्त आणि फक्त आपण स्वतःच   हर्ट करत असतो.  बाहेरून आपल्याला फक्त शारीरिकच इजा होऊ  शकते . भावनिक दुखापत म्हणजे निव्वळ आपल्या  विचारांचा  चुकीचा गैरसमज . आपल्याच  विचारांचा गोंधळ.   कोणीच आपल्याला  आतून  दुःखी  नाही करू शकत. इंफॅक्ट  जोपर्यंत आपण   allow  करत नाही तोपर्यंत तर नक्कीच. कारण समोरील  व्यक्तिचे शब्द आपल्या कानाद्वारे मेंदूपर्यंत जातात परंतू  त्याला आपल्या मनात नेण्याचे काम हे  आपणच करत असतो.  वेगवेगळे अर्थ लावून  त्यावर नको तितकी चर्चा  स्वतःशीच करत बसतो आणि आपणच स्वतःला हर्ट करतो.  
आता यावर उपाय काय ?  तर हो  याचेही उत्तर आहे. 
जेव्हा कधी अशी परिस्थिती किंवा  प्रसंग आपल्या समोर येतो की जिथे आपण  हर्ट  झाले आहोत असे वाटते तेव्हा काही क्षण थांबून  परिस्थिती किंवा  समोरील व्यक्तीचा  थोडा विचार करावा . कारण प्रत्येक वेळी समोरील व्यक्ती आपल्याला फक्त हर्ट  करण्याच्या  उद्देशानेच  बोलते अस नसते .   एक तर कधी कधी ती  व्यक्ती आपल्या  चांगल्या साठीच बोलत असते . दुसरे असू शकते की ती व्यक्ती स्वतःचा   comfort zone  शोधत असते, आणि   स्वतःचा comfort zone  पाहणे तर  चुकीचे नाही ना. आपणही तेच करत असतो तर मग हर्ट का व्हायचे?   फक्त आपला  कम्फर्ट झोन पाहत असताना  आपल्यामुळे  समोरील व्यक्ती दुखावली जाते हे त्यावेळी  लक्षात येत नाही,  आणि आपण हर्ट होतो . त्या  व्यक्तीच्या बोलण्याचा  चुकीचा संदर्भ लावत असतो , उगाचच  ते शब्द आठवून त्यावर वारंवार  उलटसुलट विचार करून आपण स्वतःला त्रास देत बसतो.  यापेक्षा कधी तरी समोरच्याच्या जागेवर बसून विचार करावा, की त्याचे ही म्हणणे बरोबर  असेलच ना.    एक simple  funda आहे, यातून बाहेर पडण्याचा  जेव्हा  आपलीच व्यक्ती आपल्याला काही बोलते तेव्हा  हर्ट   होण्याऐवजी  ती व्यक्ती आपलीच आहे काय फरक पडतो बोलल तर   सांगू नंतर समजावून, हक्काचाच माणूस...आपल्याला नाही बोलणार तर कोणाला बोलणार....
 आणि जेव्हा  बाहेरील व्यक्ती बोलते तेव्हा  जाऊ दे ना कितीही केलं तरी ते परकेच काय फरक पडणार त्यांच्या बोलण्याने. परके लोक  आपल्याला कधीच matter करत नसतात बरोबर ना . 


अजून एक आपल्या बाबतीत  जे काही घडत आहे त्याला  फक्त आणि फक्त  आपणच  जबाबदार आहोत  आणि हे आपल्या   कर्माचे फळ आहे असा विचार जेव्हा येईल त्या  क्षणी आपले हर्ट होणे हे शून्यात जमा होईल.  कर्माचे रिटर्न्स तर  येणारच ना  it's a Law.     आपण स्वतः जबाबदार  म्हंटल्यावर  विषयच  संपतो. 
एकूण काय तर  आपण  एखाद्या चे बोलणे कसे घेतो यावर हर्ट अवलंबून असते. त्यासाठी आपणच आपले विचार बदलावे वर सांगितल्याप्रमाणे .....
हा  Funda  सगळ्यांनाच लागू होईल असे नाही कारण  सगळेच जण असा विचार करतील हे गरजेचे नाही,  पण एकदा  प्रयत्न तर करून बघा जसे बाकीच्या गोष्टीसाठी करतो... काय माहीत कदाचित Work करून जाईल. ....

 No one can Hurt you....need to change your thoughts only ☺♥























टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट