संयम - Patience

 बऱ्याचदा आपण तारतम्य  न बाळगता वागत असतो, तेव्हा आपला संयम सुटतो. कधी कधी आपल्याला संयम सुटला आहे हे सुध्दा कळत नाही आणि जोपर्यंत समजतं तेव्हा उशीर झालेला असतो. मुळात आपला संयम कोणकोणत्या परिस्थितीत का, कसा सुटतो याबद्दल थोडे......
सर्वात प्रथम एखाद्याला विचारले की संयम कधी सुटतो तर सगळेच सांगतील की रागात. ....... जर यावेळी आपण आपले मन आणि विचार शांत  ठेवलं तर संयम पाळू शकतो. परंतु प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. Critical situation  मध्ये मन स्थिर राहूच शकत नाही. कारण आपण साधू किंवा संत नाही. राग हा Visible आहे त्यामुळे तिथे संयम सुटला तर तो दिसतो. परंतु या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात जिथे आपला संयम सुटतो पण दिसत नाही...... invisible Situation
 तर या  Invisible Situation कोणत्या ? जिथे कुठेही आपण मोहांच्या क्षणांना  बळी पडतो म्हणजे एखादी वस्तू विकत घेणे बाबत , खाण्या पिण्या बाबत असो, शारीरिक आकर्षण ,एखादी परिस्थिती हाताळता न येणे किंवा आपल्याकडे असलेल्या नॉलेजचे प्रदर्शन करण्यापासून स्वतःला रोखू न शकणे असं बऱ्याच Invisible Situation   असू शकतात . जिथे आपण शांत असून सुद्धा शांत राहू शकत नाही आणि आपला संयम सुटतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला जाणवत नाही दिसत नाही. 
   प्रत्येक परिस्थिती वेगवेगळी असू शकते ,पण तिथेही संयम बाळगण्याची  गरज असतेच ना?  अशावेळी काय करायचे ? कसे रोखायचे स्वतःला?  मुळात स्वतःला का रोखायचे हा प्रश्न पडला असेल..... आपण या छोट्या छोट्या गोष्टीत जर संयम बाळगायला शिकलो तर भविष्यात परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला याचा उपयोगच  होणार आहे.  कारण आपल्या आयुष्यात मोठ्या घटना रोजच घडत नाही.  जसे एखादी व्यक्ती सोडून जाणे, भांडणे होणे ,नुकसान होणे, अपघात होणे या कधीतरी घडणाऱ्या घटना परंतु बऱ्याच छोट्या-छोट्या परिस्थितीतून आपल्याला रोज जावे लागते. ठेच आपल्याला मोठ्या दगडाची नाही तर छोट्या दगडाची लागते. बऱ्याचदा मोठी परिस्थिती असेल तर व्यक्ती  आपोआप सावरते किंवा तिला रोखण्यासाठी मागे आपली  माणसं असतातच .......परंतु छोट्या-छोट्या परिस्थितीत आपल्याला स्वतःलाच संयम बाळगावा लागतो. मुळात होणाऱ्या परिणामांची पुसटशी  जरी कल्पना आली तरी आपण बऱ्यापैकी स्वतःवर अंकुश लावू शकतो. पण ते केव्हा शक्य होणार ते Presence of Mind  ने किंवा Mind  Distraction..... हे Invisible Situation मध्ये होऊ शकत . म्हणजे जिथे कुठे आपल्याला वाटत संयम सुटतोय ( आधी आपल्याला हे कळणार नाही त्यासाठी Presens of Mind ) तिथून आपले मन वळवा किंवा त्या जागेतून , परिस्थितीतून बाहेर पडा . आता काही जणांना वाटेल हा तर पळपुटेपणा. परिस्थितीत राहूनही स्वतःवर अंकुश ठेवता यायलाच हवा .....परंतु पळपुटेपणा आपल्या हिताचा असेल तर काय वाईट?  श्रीकृष्णाला सुद्धा रणछोडदास म्हणतातच ना...... 
पुढे होणाऱ्या परिणामांचे नुकसान किंवा मानसिक ताण सहन करण्यापेक्षा तेवढ्यापुरता आपण आपले मन तर नक्कीच वळवू शकतो कारण परिस्थिती फारशी मोठी नसते आणि हे सहज जमण्यासारखे ही असते. छोट्या-छोट्या परिस्थिती स्वतःवर अंकुश ठेवता आला तर मोठ्या परिस्थितीतही संयम बाळगता येऊ शकतो कारण याची सवय झालेली असते. त्यामुळे आपण परिस्थिती कोणताही ताण न घेता आणि संयम न सोडता हाताळू शकतो. 
बघा  एकदा प्रयत्न करून आपापल्या Invisible Situation मध्ये Mind Distraction ने संयम बाळगता येतो का? नक्कीच जमेल.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट