सेल्फी


सेल्फी आपल्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही.सेल्फी म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात विचार येतो तो स्वतःचा फोटो काढणे. मोबाईल मुळे स्वतःचा फोटो स्वतः काढणे शक्य झाले आहे, म्हणूनच म्हटले  जातं की हल्ली माणसे इतकी अलिप्त झाली आहेत की आपल्याला स्वतःचा फोटो काढण्यासाठी ही कोणाची गरज राहिली नाही. झालीच आहे माणसे सध्या अलिप्त तेही स्व मध्ये.... पण हा स्व आहे तो अहंकाराचा.......
संवेदनशीलता संपत चाललेली आहे . परंतु सगळेच जण काही असंवेदनशील नाही.  संवेदनशीलता आजही आहे, प्रत्येकात आहे , पण भौतिक  गोष्टींमुळे ती हरवली आहे,  भरकटली आहे , माणस मोहात आहे. वरील वाक्य पटतंय  मला तरी .....याकडे थोड्या सकारात्मक पद्धतीने पाहू या.   
जेव्हा आपण दुसऱ्याला फोटो काढायला सांगतो तेव्हा तो स्वतःच्या म्हणजेच त्याच्या नजरेतून तो तुम्हाला पाहत असतो. असे कर ,असा उभा राहा,  इथे बघ , असं बरंच काही , तो त्याचा पॉईंट ऑफ यू . परंतु जेव्हा आपण सेल्फी काढतो तेव्हा आपण  स्वतःला पूर्णपणे स्वतःच्या नजरेतून पाहत असतो. आपली ..... स्माईल, डोळे ,फेस एक्सप्रेशनस सगळं काही आपल्या नजरेतून असते. म्हणजेच आपण जसे कसे आहोत ते सगळे स्वतःच्या नजरेत. त्याहूनही पलीकडे जाऊन विचार केला तर आपल्यातला कॉन्फिडन्स दिसतो आणि हेच महत्त्वाचं असतं. कॉन्फिडन्स आपले शारीरिक आणि मानसिक सौंदर्य वाढवतो. तो तुमच्या देहबोलीतून आणि विचारातून दिसून येतो . त्यानंतर येतात आपले डोळे.... डोळे आपल्या मनाचा वेध घेत असतात,  म्हणजेच आपली नजर मनापर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग आहे .सेल्फी मध्ये  हे होऊ शकते . आधी आपल्या मनापर्यंत पोहचा.
वरवर पाहता सेल्फी म्हणजे लोकांनी आपल्यालाच बघावे , आपल्याकडेच लक्ष द्यावे असे , खरंतर सेल्फी म्हणजे स्वतःमध्ये डोकावणे. आपण जेव्हा सेल्फी काढतो तेव्हा बाह्य प्रतिबिंबावर फोकस करतो How Look I am...... परंतु त्यापलीकडेही जाऊन पाहता आलं पाहिजे ते कसं ?  
मूळात मोबाईल ला दोन कॅमेरा का ? बॅक कॅमेराने आपण जग बघतो आणि फ्रंट कॅमेरा ने स्व.... मग ते जग बघायला स्व उत्तम हवा. त्यामुळे दोन कॅमेरा.....  मुळात सेल्फी मध्ये समाधान असतं कारण त्यात लिमिटेड सामावत.  बॅक कॅमेरा मध्ये जग आहे पण त्या फ्रेम मध्ये आपण नाही. सेल्फी काढताना  ही आपण सगळ्यांशी connect   राहू शकतो.  त्यासाठी हवा दृष्टीकोन .....तो म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी कडे किती purely पाहू शकतो.  स्व मध्ये राहून सुद्धा आपण या जगासोबत असू शकतो. 
सेल्फी मुळे अजून एक समजते, आपण स्वतः स्वतः कडे कसे पाहतो. यात आपल्या बाह्यरूपा सोबतच आपल्यातली निरागसता, आत्मविश्वास , नजरेतला गहिरेपणा , आंतरिक समाधान याचा सुद्धा आपण वेध घेऊ शकतो. 
एकूणच सेल्फी म्हणजे  self fie..... स्वतःला फिल करणे.  त्यासाठी आपल्या मनाचा कॅमेरा ऑन करा त्यात आपल्या विचारांचे रंग भरा मग बघा कसा सेल्फी दिसेल.
So.....sit or stand comfortably, Set your angle , increase your confidence, Take your thoughts to the next level  & click your Best Selfie......
 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट