वृक्ष
निसर्गाने पृथ्वीला दिलेली सर्वात अमूल्य आणि अप्रतिम अशी भेटवस्तू म्हणजे वृक्ष , वेली , झाडे.......
झाडांबद्दल काय आणि किती बोलावे ...... किती लिहावे ..... झाडांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या झाडांचे विविध उपयोग आणि विविध औषधी गुण.
झाडे आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास दाखवत असतात. अंकुर फुटलेल्या कोवळ्या पानांपासून तर वाळून गळून पडलेल्या पानांपर्यंत हे आपल्याला माहीतच आहे.
पण मी झाडांबद्दल थोडं वेगळं काही लिहिणार आहे. कदाचित बऱ्याच जणांनी या गोष्टी कधी तरी पहिल्याही असतील . झाडांकडे मी थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहते ... जसे आपण मनुष्य आपल्याला वेगवेगळ्या भावना असतात, वेगवेगळे रूप असतात , गुण असतात तसच या झाडांनाही असतात बरं का... पाहिल्या आहेत का कधी झाडांच्या भावना?
मी पाहिल्या आहेत ...हो हो भावना..... माझ्या नजरेने माझ्या शब्दात काही भावना झाडांच्या वृक्षांच्या...
जसे आपल्याला प्रेम ,आनंद , राग , उदासीनता जाणवतेे तसेच झाडांनाही या भावना असतात बर का.....
जेव्हा झाडांची पाने जोरात सळसळतात तेव्हा ती रागात असतात ,जेव्हा झाडांची पाने फांद्या हळुवार डोलतात.... तेव्हा ती आनंदात असतात. आनंदाने नाचत असतात. वृक्षवेली, झाडे जेव्हा बहरतात ,फुलतात ......तेव्हा ती प्रेमात असतात. आहे की नाही गंमत. जेव्हा कधी झाडे कोमेजलेली दिसतात , त्यांची पाने फांद्या स्तब्ध असतात तेव्हा ती उदास असतात. जेव्हा झाडांची कत्तल केली जाते तेव्हा ती रडत असतात.
झाडांची वेगवेगळी रुपे म्हणजे काही झाडे बुटकी ,काही उंच तर काही अगदीच उंच काही विस्तारलेली काही पसरलेली तर काही अगदी प्रमाणबद्ध वाढलेली.
ही झाडे शृंगारही करतात बर का.... जेव्हा झाडांवर सुंदर रंगीबेरंगी फुले फळे विविध रंगांची पाने येतात तोच त्यांच्या शृंगाराचा एक भाग असतो. विविध रंगांचे फुलपाखरू जेव्हा त्या झाडांवर येतात तेव्हा त्यांच्या सुंदरतेत आणखीनच भर पडते. पावसाच्या पाण्याचे थेंब जेव्हा दवबिंदू बनून पानांवर थबकतात तेव्हा तेच दवबिंदू जणू मोत्यांची माळ बनते आणि झाडे ती परिधान करतात.
जेव्हा सूर्याची किरणे त्या दवबिंदू मधून परावर्तित होतात तेव्हा त्यांना जणू सोन्याची झळाळीच मिळते. काय सुंदर साजरे रूप दिसते तेव्हा त्यांचे.☺️☺️
झाडांमध्ये काही अध्यात्मिक गुणही असतात.
जेव्हा झाडांना दगडे मारले जातात, त्यांची कत्तल केली जाते तेव्हा हीच झाडे संयम ठेवतात. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे .
देयता - झाडे नेहमीच आपल्याला बरच काही देत असतात. सावली, फळे ,फुले , प्राणवायू आणि तेही निस्वार्थ .....कोणतीही अपेक्षा न ठेवता.
स्वयं प्रेरणा - ही यांच्याकडूनच शिकावी. कोणाकडून आपल्याला पाणी मिळेल याची वाट न पाहता ती स्वतःच आपली मुळे लांब पर्यंत पसरवत पाण्याचा शोध घेतात. छाटलेल्या झाडांमधूनही नवीन अंकुर फुटतात हीच ती स्वयं प्रेरणा.
स्थिरता - वादळ, वारा, ऊन ,पाऊस .....परिस्थिती कशीही असो ही झाडे मात्र स्थिर असतात. अगदी आपली पाळेमुळे जमिनीशी घट्ट रोवून. काही अपवाद असतात, कधी कधी काही झाडे उन्मळून पडतात ही पण ती एका नाविन्याच्या सुरुवातीसाठी.
झाडे कधीच भेदभाव करत नाही. जमिनीवर राहणाऱ्या कीटकापासून ते आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षांपर्यंत झाडे सर्वांनाच आपलीशी करतात. त्यांना अन्न, सावली,निवारा यांच्यामुळेच मिळतो.
नम्रता - झाडे, वेली जितकी जास्त बहरतात, फळतात, फुलतात तितकी ती वाकत जातात. म्हणजेच नम्र होतात.
एकूणच काय तर झाडेही आपला गुरु होऊ शकतात. फक्त आपल्याला त्यांच्याकडे योग्य दृष्टीने पाहता आलं पाहिजे. कारण त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. असं वाटतं तासनतास त्या झाडांना पहात बसावे ......त्यांच्यासोबत बसावे ........एक समाधान मिळतं त्यांना पाहून, त्यांचा टवटवीतपणा पाहून प्रसन्नता मिळते. मन, विचार प्रफुल्लित होतात बरोबर ना....... अशा बऱ्याच गोष्टी मला या झाडांमध्ये, वृक्षांमध्ये दिसतात ,वेलींमध्ये दिसतात.
बघा प्रयत्न करून तुम्हीही बसा झाडांसोबत तुम्हालाही जाणवेल असंच बरंच काही वेगळं काही.....
Mind Feel Always Peaceful with Nature ........😌😌
Awesome...
उत्तर द्याहटवाधन्यवाद KisH ☺
हटवासुंदर शब्दांकन... पुढील लेखनास शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाधन्यवाद .... तुमचे नाव ?
हटवा